आनंद गवस यांची जिल्हा सॉ मिल असोसिएशन अध्यक्षपदी निवड, झाल्याबद्दल बांदा येथे सत्कार..

बांदा
सिंधुदुर्ग जिल्हा सॉ मिल असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल बांदा मराठा समाजाचे माजी उपाध्यक्ष तसेच उद्योजक आनंद गवस यांचा बांदा मराठा समाजाच्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.आनंद गवस हे गेल्या अनेक वर्षांपासून सॉ मिल व्यवसायात सक्रिय असून, आपल्या अनुभवाच्या बळावर त्यांनी या क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली आहे. जिल्हास्तरावर नेतृत्व करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे आल्याने बांदा परिसरासह संपूर्ण मराठा समाजात समाधान व्यक्त करण्यात येत आहे. यापूर्वी त्यांनी बांदा मराठा समाज मंडळात उपाध्यक्षपदाची जबाबदारी समर्थपणे पार पाडत सामाजिक कार्यातही मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या या निवडीबद्दल उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन करत पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी बांदा मराठा समाजाचे अध्यक्ष विराज परब, माजी अध्यक्ष निलेश मोरजकर, सचिव आनंद वसकर, सहसचिव हेमंत मोर्ये-सावंत, ग्रामपंचायत सदस्य रत्नाकर आगलावे, अक्षय परब, प्रभाकर गावकर, माजी खजिनदार राकेश परब, जय पटेकर-सावंत, मनोज सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top