आमदार निलेश राणे यांचा विकासकामांचा धडाका सुरू.

जलयुक्त शिवार अंतर्गत कुडाळ व मालवण साठी ६ कोटी ७० लाखांचा निधी मंजूर.

कुडाळ
आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून शासनस्थरावरून मतदारसंघात जास्तीत जास्त निधी आणण्याचा धडाका सुरू असून आतापर्यंत मतदारसंघात कोट्यावधींचा निधी विविध विकासकामांसाठी मंजूर करण्यात आला आहे. आता महाराष्ट्र शासनाच्या महत्वकांक्षी जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत कुडाळ तालुक्यातील एकूण १४ कामांसाठी ५ कोटी ७० लक्ष तर मालवण तालुक्यातील एकूण ३ कामांसाठी १ कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

यात वर्दे (मांगरवाडी) येथे सिमेंट नाला बंधारा बांधणे-
२१,५६,८९०.००, माणगाव ढोलकरगाव येथे सिमेंट नाला बंधारा बांधणे- ७८,७१,६६३.००, चेंदवण (वेलवाडी) येथे सिमेंट नाला बंधारा बांधणे २१,५५,५०७.००, चेंदवण २ (वेलवाडी स्मशानभूमी) येथे सिमेंट नाला बंधारा बांधणे.२५,८६,३३६.००, हुमरस (वारंगवाडी) येथे सिमेंट नाला बंधारा बांधणे-४४,८५,९२६.००, पावशी मिटक्याची वाडी (नालंगवाडी) येथे सिमेंट नाला बंधारा बांधणे-२४८८१८८.००, कुंदे (परबवाडी) येथे सिमेंट नाला बंधारा बांधणे ३०,१०,६१७.००, घावनळे (गावठाणवाडी) येथे सिमेंट नाला बंधारा बांधणे ५६,४१,८७८.००, रायगाव-माड्याचीवाडी येथे सिमेंट नाला बंधारा बांधणे ३०,५८,३७५.००, जांभवडे (गावनमाळा) येथे सिमेंट नाला बंधारा बांधणे २९,८२,४३८.००, निवजे (चव्हाटवाडी) येथे सिमेंट नाला बंधारा बांधणे २८,९७,६९९.००, मोरे (मधलीवाडी) येथे सिमेंट नाला बंधारा बांधणे २९,८२,४३८.००, पडवे (थोरले तलाव) येथे सिमेंट नाला बंधारा बांधणे ६४,८४,५७१.००, पणदूर (माऊली मंदिर) येथे को. प. बंधारा बांधणे ८१,७४,३५३.००
कातवड (पाळशीवाडी) येथे सिमेंट नाला बंधारा बांधणे ५६,२६,८१७.००, रामगड-१ येथे सिमेंट नाला बंधारा बांधणे २१,०७,४३४.००, रामगड २ येथे सिमेंट नाला बंधारा बांधणे २२,३७,७७४.००, या कामांना मंजुरी देण्यात आली असून यामुळे सदरील सर्व गावांमध्ये सिंचनासाठी मोठा पाणीसाठा उपलब्ध होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top