मुंबई पोलिस घटनास्थळी दाखल, वेगाने तपास सुरू
मुंबई प्रतिनिधी
राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या मुंबईतील शासकीय निवासस्थानाबाहेर अज्ञाताने एक संशयास्पद बॅग ठेवल्याचे आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
मुंबईतील सुवर्णगड बंगल्याबाहेर अज्ञात व्यक्तीने बॅग ठेवल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांना तात्काळ माहिती देण्यात आली. माहिती मिळताच मुंबई पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून संपूर्ण परिसर बॅरिकेट्स लावून निर्मनुष्य करण्यात आला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सुरक्षेची कडेकोट व्यवस्था करण्यात आली आहे. मुंबई पोलीसांकडून बॅगेची तपासणी सुरू असून अधिक तपास केला जात आहे. अद्याप या बॅगेत नेमके काय आहे, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
