भाजप युवा नेते विशाल परब यांच्या हस्ते उद्या होणार लोकार्पण.
सावंतवाडी प्रतिनिधी
माडखोल येथील माजी सैनिकांच्या व ग्रामस्थांच्या बहुप्रतिक्षित अशा ‘सैनिक भवना’चा लोकार्पण सोहळा उद्या आयोजित करण्यात आला आहे. भारतीय जनता पक्षाचे धडाडीचे युवा नेते विशालजी परब यांच्या हस्ते या नूतन इमारतीचे उद्घाटन संपन्न होणार आहे.
माजी सैनिकांच्या सन्मानार्थ आणि त्यांच्या कार्याला वंदन करण्यासाठी या भवनाची निर्मिती करण्यात आली आहे. या उद्घाटन सोहळ्याला परिसरातील अनेक मान्यवर, माजी सैनिक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. विशाल परब यांच्या आक्रमक आणि कार्यतत्पर नेतृत्वाखाली हा सोहळा अत्यंत उत्साहात पार पडणार आहे
