आमदार नितेश राणे यांच्या मागणी वरून सीएसटी ते करमळी स्पेशल रेल्वेला वैभववाडी आणि सावंतवाडी मिळाला थांबा.!

आमदार नितेश राणे यांनी मानले रेल्वे मंत्र्यांचे आभार…

कणकवली,ता.१३:
०११५१/०११५२ सीएसटी ते गोवा करमळी अशा धावणाऱ्या हिवाळी विशेष रेल्वे गाडीला आमदार नितेश राणे यांच्या मागणीची दखल घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी रोड आणि सावंतवाडी रोड येथे थांबे देण्यात आले आहेत. आमदार नितेश राणे यांनी रेल्वे मंत्रालय आणि रेल्वे प्रशासनाकडे याबाबतचा पत्रव्यवहार करून तातडीने हे थांबे मंजूर केले जावेत अशी विनंती केली होती आणि या विनंतीला मान देऊन प्रशासनाने वैभववाडी आणि सावंतवाडी या दोन्ही रेल्वे स्थानकावर ही गाडी जाता येता थांबवण्याचे आदेश जारी केले आहेत. रेल्वेच्या या निर्णयामुळे आमदार नितेश राणे यांनी रेल्वेमंत्री तसेच रेल्वे प्रशासन यांचे आभार व्यक्त केले आहेत.
याबाबत कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार मुंबई ते गोव्यातील करमळी दरम्यान दररोज चालवण्यात येणाऱ्या विशेष गाडीला सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैभववाडी आणि सावंतवाडी स्थानकांवर अतिरिक्त थांबे मंजूर केले आहेत. असे जाहीर केले आहेत.
हिवाळी हंगामात सीएसटी ते करमळी अशी गाडी कोकण रेल्वे मार्गावरून धावते या गाडीला सावंतवाडी आणि वैभववाडी या दोन महत्त्वाच्या तालुक्यात थांबा मिळाला असल्यामुळे प्रवाशांमधून समाधान व्यक्त केले जात आहे तसेच आमदार नितेश राणे यांनी हे थांबे मिळावेत म्हणून केलेल्या प्रयत्नाबद्दल जनतेतून आभारही व्यक्त केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top