वादळी वाऱ्यामुळे सावंतवाडीत झालेल्या नुकसानाची पालकमंत्री नितेश राणे यांनी केली पाहणी…
नुकसानग्रस्तांना जास्तीत जास्त भरपाई देण्याचे आश्वासन… सिंधुदुर्गनगरी:दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादळामुळे सावंतवाडी शहरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, करण्यात आलेल्या पंचनाम्यांनुसार अंदाजे २५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. याबाबत सावंतवाडी तहसीलदारांनी सविस्तर अहवाल सादर केला असून, जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून शासकीय निकषांनुसार जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करण्यात…
