कणकवली प्रतिनिधी
राज्यात अत्यंत चुरशीची आणि लक्षवेधी ठरलेल्या कणकवली नगरपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार समीर नलावडे यांचा पराभव करून विजय मिळवलेले शहर विकास आघाडीचे नूतन नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यासह संपूर्ण राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून संदेश पारकर यांच्या पुढील राजकीय वाटचालीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या महत्त्वपूर्ण भेटीदरम्यान राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, शहर विकास आघाडीचे जनक तथा माजी आमदार राजन तेली आणि प्रथमेश तेली आदी उपस्थित होते.
