मालवण
शिक्षण विभागाच्यावतीने जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनानिमित्त घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत मसुरे आर. पी. बागवे हायस्कूलचा विद्यार्थी कु. चैतन्य भगवान भोगले याने उल्लेखनीय यश संपादन करत तृतीय क्रमांक पटकावला. या यशाबद्दल त्याचा जिल्हा शिक्षणाधिकारी (माध्यमिक) श्रीम. कविता शिंपी मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
