संजू परब यांची मागणी; नगरसेवकांसह कचरा डेपोवर जाऊन केला स्पॉट पंचनामा…
सावंतवाडी
सावंतवाडी कचरा डेपो ची आज परिस्थिती पाहिली तर ती अत्यंत गंभीर आहे इकडच्या कामगारांना कोणत्याही प्रकारच्या सुविधा नाहीत, अशा परिस्थितीत देखील ते काम करत आहेत, तसेच आजूबाजूच्या नागरिकांना देखील याचा मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे तरी मी पालकमंत्री नितेश राणे याची दखल घेऊन त्वरित सावंतवाडी तालुक्यात आजूबाजूला कोणत्याही लोकांना त्रास न होता एक 25 एकर ची जागा आम्हाला द्यावी अशी मागणी जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक संजू परब यांनी आज येथे केली.ते म्हणाले आज सावंतवाडी शहरातील कचरा डेपोची अवस्था ही बिकट आहे त्यांना कोणत्याही प्रकारच्या कर्मचाऱ्यांना सुविधा नाहीत अशा परिस्थितीत ते काम करत असताना भविष्यात या ठिकाणी कचरा टाकण्यासाठी जागा देखील शिल्लक राहणार नाहीये तरी पालकमंत्र्यांनी याची त्वरित दखल घेऊन आम्हाला एक 25 एकर ची जागा शासनाच्या माध्यमातून मंजूर करावी जेणेकरून हा प्रश्न कायमचा मार्गी लागेल असेही परब म्हणाले. दरम्यान आम्हाला कोणावर टीका करायचे नाही परंतु हा प्रश्न अत्यंत गंभीर या ठिकाणाच्या मशिनीदेखील बंद आहेत त्यामुळे याच्यावर तोडागा निघायला पाहिजे यासाठी आम्ही हा आज स्पॉट पंचनामा केला असल्याचा देखील परब स्पष्ट केले. पाहणी करायला जात नाही तर आम्ही लोकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाचं पाहणी करायला या ठिकाणी आल्याचा देखील टोला संजू परब यांनी यावेळी भाजपला लगावला.
यावेळी नगरसेवक बाबू कुडतरकर, देव्या सूर्याजी, अजय गोंदावळे सायली दुभाषी शर्वरी धारगळकर स्नेहा नाईक आदी उपस्थित होते
