दुकानवाड प्रतिनिधी
साळगाव येथील शिवराज मराठा माध्यमिक विद्यालयाच्या क्रीडांगणावर पार पडलेल्या तालुकास्तरीय बाल क्रिडा स्पर्धेत मोठा गट मुली या गटात वसोली केंद्र शाळेतील विद्यार्थ्यांनी आर्या रविंद्र शिंदे हीने गोळा फेक मध्ये प्रथम क्रमांक मिळवला असुन तिची जिल्हास्तरावर निवड झाली आहे.तिला शाळेचे मुख्याध्यापक दिलीप उबाळे व शिक्षक प्रदिप कुत्तरमारे यांचे मार्गदर्शन लाभले. अतिशय ग्रामीण दुर्गम भागातील शाळेतील मुलीने मिळविलेल्या या यशाबद्दल सरपंच अजित परब शाळा व्यवस्थापण समितीच्या अध्यक्षा व ग्रा. प. सदस्या दिक्षा तवटे, उपाध्यक्षा रेश्मा शिंदे, शिक्षण तज्ञ श्रीकृष्ण परब,जयप्रकाश परब यांनी अभिनंदन केले.
