कणकवली नगरपंचायत उपनगराध्यक्ष पदी सुशांत नाईक यांची निवड…

कणकवली
कणकवली नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष पदासाठीची निवड प्रक्रिया मंगळवारी नगरपंचायतीच्या सभागृहात पार पडली. हात उंचावून झालेल्या या मतदान प्रक्रियेत कणकवली शहर विकास आघाडीचे सुशांत नाईक यांनी भाजपच्या राकेश राणे यांच्यावर मात करत उपनगराध्यक्षपद पटकावले.मतदान प्रक्रियेत राकेश राणे यांना ९ मते मिळाली. तर नगराध्यक्षांना मताचा अधिकार असल्याने व कणकवली शहर विकास आघाडीचे आठ नगरसेवक असल्याने सुशांत नाईक यांना देखील ९ मते मिळाली. अखेरीस शासन निर्णयानुसार नगराध्यक्षांना निर्णायक मताचा अधिकार असल्याने सुशांत नाईक हे एका मताने विजयी झाले. नाईक यांच्या विजयानंतर शहर विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी फटाक्याची आकाशबाजी जोरदार घोषणाबाजी करून जल्लोष केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top