भाजपच्या महापालिका यशाबद्दल मंत्री नितेश राणेंनी केले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन

मुंबई प्रतिनिधी
राज्यात मुंबईसह बहुतांश महानगरपालिकांमध्ये भाजपने घवघवीत यश मिळवत जोरदार मुसंडी मारली आहे. या यशानंतर राज्याचे मत्स्योद्योग व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.

मुंबई महापालिकेत ठाकरे गटाची सत्ता खेचून भाजपच्या नेतृत्वाखाली महायुतीची सत्ता स्थापन झाल्याबद्दल मंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांचे विशेष अभिनंदन केले. भाजपच्या संघटनशक्तीचा आणि नेतृत्वाचा हा विजय असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

या प्रसंगी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीश महाजन, मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह पक्षाचे अन्य प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top