आंबा-काजू पिक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना जिल्हा बँकेकडून १कोटी ९० लाख व्याज सवलत जमा:मनिष दळवी
सिंधुनगरी प्रतिनीधी:बँकेने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे २% प्रमाणे व्याजाची रू.१कोटी ९०लाख एवढी रक्कम शेतकऱ्यांना शेती हंगामामध्ये प्राप्त झाल्याने काही अंशी शेतीच्या कामास मदत होईल अशी अपेक्षा जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी व्यक्त केली आहे.सन २०२५-२६ या वर्षात अवकाळी पाऊस, वादळ, धुके, खार व दव पडणे इत्यादी हवामानातील बदलामुळे आंबा व काजू उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत आलेले…
