सिंधुदुर्ग जिल्ह्यात भंडारी समाज भवन होणारच ही माझी जबाबदारी;पालकमंत्री नितेश राणे

जिल्हा भंडारी समाजाला दीला शब्द

कणकवली प्रतिनिधी:
सिंधुदुर्ग जिल्ह्यात भंडारी समाज भवन कुडाळ मध्ये व्हावे ही आपल्या कडे भंडारी समाजाने केलेली मागणी आपण पुर्ण करणारच असा शब्द आज सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी समाज जिल्हा पदाधिकारी यांना पालकमंत्री ना नितेश राणे यांनी दीला
सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हा भंडारी भवन व्हावे अशी मागणी जिल्ह्यातील भंडारी समाजाने पालकमंत्री ना नितेश राणे यांच्या कडे केली होती त्या मागणीचा पाठपुरावा पुर्ण करुन पालकमंत्री ना नितेश राणे यांनी दीला म्हणून आज जिल्हा भंडारी समाजाच्या वतीने आभार मानुन भवनासाठी निधी देण्या संदर्भात निवेदन देण्यात आले

कुडाळ येथे जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठीकाणी भुखंड
यावेळी पालकमंत्री ना राणे म्हणाले कुडाळ येथील जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठीकाणी भुखंड मंजुर करुन गेले वर्षभर शासकीय यंत्रणा कामाला लावुन कायदेशीर सोपस्कार महसुल यंत्रणेने पुर्ण केल्याने आता राज्यशासनाकडे पाठपुरावा आपणं करणार असल्याचे ना राणे यांनी सांगितले,
भंडारी समाजाचे भुषण म्हणजे मच्छिंद्र कांबळी नाट्य गृह
यावेळी भंडारी समाजाचे श्री अतुल बंगे आणि राजु गवंडे म्हणाले कुडाळ येथे भंडारी समाजाचे भुषण मच्छिंद्र कांबळी नाट्य गृह बांधकाम झाले त्याला चालना देऊन उर्वरित काम पुर्ण करण्याचे आमदार डॉ निलेश राणे यांनी भरीव काम केले आहे
गणेशोत्सव काळात भंडारी भवनाचे भुमीपुजन
यावेळी जिल्हा भंडारी समाजाचे जिल्हा अध्यक्ष श्री हेमंत करंगुटकर म्हणाले या वर्षी गणेशोत्सव काळात पालकमंत्री ना नितेश राणे साहेब यांची वेळ घेऊन भुमीपुजन सोहळा भव्य दिव्य स्वरुपात करणारं असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष श्री हेमंत करंगुटकर यांनी दीली
जिल्ह्यातील भंडारी समाज हा पालकमंत्री ना नितेश राणे यांचा रूणी राहील असे भंडारी समाजाचे जेष्ठ नेते लक्ष्मीकांत मुंडये यांनी सांगितले

अतुलजी तुम्हाला दीलेला शब्द पुरा केला ना मग आता पुढची जबाबदारी माझ्यावर सोपवा असे या भंडारी भवनासाठी पाठपुरावा करणारे अतुल बंगे यांना पालकमंत्री ना नितेश राणे यांनी सांगितले

यावेळी जिल्हा अध्यक्ष श्री हेमंत करंगुटकर, कार्याध्यक्ष श्री राजु गवंडे, जिल्हा सचिव हेमंत सावंत, जिल्हा कार्यकारणी पदाधिकारी दीवाकर म्हाळवणकर, भंडारी समाजाचे नेते लक्ष्मीकांत मुंडये, शिक्षक नेते राजन कोरगावकर, कणकवली भंडारी समाजाचे निलेश गोवेकर,कसाल भंडारी समाजाचे मारुती वायंगणकर आदी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top