व्हॉईस ऑफ मीडियाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विजय चोरडिया यांची हेलसकर कुटुंबीयांना सांत्वनपर भेट

परभणी प्रतिनिधी:सेलू, जिल्हा परभणी येथील व्हॉईस ऑफ मीडिया व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरमचे कार्याध्यक्ष बाबासाहेब हेलसकर यांच्या दुर्दैवी निधनाने पत्रकारिता क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. पत्रकारांच्या हक्कांसाठी आणि पत्रकारितेच्या हितासाठी ते संघटनेच्या माध्यमातून सक्रियपणे कार्यरत होते. त्यांच्या निधनानंतर व्हॉईस ऑफ मीडिया व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरमचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विजय चोरडिया यांनी हेलसकर कुटुंबीयांची नुकतीच…

Read More

पिक पंचनामे १६ ऑक्टोबरपूर्वी मिशन मोडवर पूर्ण करा:जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे

डीसीएस एमएच ॲपद्वारे ई-पीक पाहणी, मतदार यादी पुनरीक्षण आणि ऑनलाइन डेटा दुरुस्तीचा आढावा सिंधुदुर्ग:जिल्ह्यातील पिक पंचनाम्यांची कामे १६ ऑक्टोबरपूर्वी मिशन मोडवर पूर्ण करावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिले. डीसीएस एमएच ॲपद्वारे ई-पीक पाहणीची मुदत ११ नोव्हेंबर असली तरी हे काम निर्धारित मुदतीपूर्वीच पूर्ण करण्यासाठी सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी नियोजनबद्ध प्रयत्न करावेत. तसेच जिल्ह्यातील वसुलीचे…

Read More

कुडाळ तालुक्यातील आंबेरी गावाचा वाडोस माणगाव मंडळात मध्ये समावेश

सिंधुदुर्ग:कुडाळ तालुक्यातील महसूल मंडळांच्या पुनर्रचनेअंतर्गत आंबेरी गावाचा तुळसुली कर्याद नारूर तलाठी साझातून माणगाव मंडळातील वाडोस तलाठी साझामध्ये समावेश करण्यास जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी अंतिम अधिसूचनेद्वारे मान्यता दिली आहे. यामुळे आंबेरी गावाचा गोठोस महसूल मंडळातून माणगाव महसूल मंडळात समावेश करण्यात आला आहे.राज्यात वाढती लोकसंख्या आणि नागरीकरणामुळे महसूल यंत्रणेवरील कामाचा वाढता ताण लक्षात घेऊन शासनाने…

Read More

शेतकऱ्यांच्या समृद्धीचा नवा मार्ग खुला, बांद्यात ‘कृषकव्हेंचर’च्या नव्या कार्यालयाचे युवा नेते विशाल परब यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून उद्घाटन!

शेतमालाला योग्य बाजारपेठ, रास्त दर आणि आधुनिक कृषी मार्गदर्शनावर भर! बांदा:शेतकऱ्यांच्या कष्टाला योग्य मोल, घामाला समृद्धीचे फळ आणि कृषी उत्पादनाला हक्काची बाजारपेठ मिळाली, तरच ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या प्रगतीला खऱ्या अर्थाने बळ मिळेल. शेतकऱ्यांच्या हाताला उत्पादनाचे सामर्थ्य आहे; मात्र त्या उत्पादनाला योग्य मूल्य मिळवून देण्यासाठी सक्षम बाजारपेठ, आधुनिक तंत्रज्ञान आणि विश्वासार्ह मार्गदर्शनाची जोड आवश्यक आहे. हाच ध्यास…

Read More

प्रधानमंत्री मातृवंदना योजनेतून मातांना आर्थिक आधार; पात्र महिलांना ११ हजार रुपयांपर्यंत लाभ:मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासूर

शारदीय नवरात्रीच्या ‘नवदुर्गा’ उपक्रमातून योजनेची जनजागृती सिंधुदुर्ग:गरोदर महिला आणि स्तनदा मातांचे आरोग्य सुधारण्यासोबतच त्यांना पोषक आहारासाठी आर्थिक आधार मिळावा, या उद्देशाने केंद्र शासनामार्फत प्रधानमंत्री मातृवंदना योजना राबविण्यात येते. या योजनेंतर्गत पात्र महिलांना पहिल्या अपत्यासाठी पाच हजार रुपये, तर दुसरे अपत्य मुलगी असल्यास सहा हजार रुपये, अशी एकूण ११ हजार रुपयांपर्यंतची आर्थिक मदत थेट बँक खात्यात…

Read More

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा स्तुत्य उपक्रम

वनराई बंधाऱ्यांसाठी २५ हजार पिशव्यांचे वितरण सिंधुनगरी प्रतिनीधी:जिल्ह्यात ठिकठिकाणी जलसंधारणासाठी वनराई बंधाऱ्यांचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू असून, या कामाला गती देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सामाजिक बांधिलकी जपत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. वनराई बंधारे बांधण्यासाठी लागणाऱ्या सुमारे २५ हजार पिशव्या बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी आज जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रमोद कामत यांच्याकडे सुपूर्त केल्या….

Read More

दुष्काळसदृश परिस्थितीवर मात करण्यासाठी शोषखड्डे निर्मिती, भूजल पुनर्भरण व हिरवाई संवर्धनावर भर

शासकीय कार्यालये, शाळा, अंगणवाड्या व सार्वजनिक ठिकाणी उपाययोजना राबविण्याचे जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे निर्देश सिंधुदुर्ग:जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थितीचा प्रभाव कमी करून उपलब्ध पाण्याचे संवर्धन, भूजल पातळीत सुधारणा आणि पर्यावरणीय संतुलन राखण्यासाठी शोषखड्डे निर्मिती, भूजल पुनर्भरण आणि हिरवाईचे आच्छादन टिकविण्यावर भर देण्यात आला आहे. यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्ष तृप्ती धोडमिसे यांनी जिल्ह्यातील संबंधित…

Read More

कविलकाटे ग्रामस्थांच्या श्रमदानातून जलसंधारण

गणेश घाटासमोर बांधला बंधारा. कुडाळ:कुडाळ शहरातील कविलकाटे येथे आज रविवारी दिनांक ११. १०.२०२६. रोजी काविलकाटे ग्रामस्थ, शेतकरी, नागरिक यांच्या श्रमदानातून कविलकाटे बाळकृष्ण नगर येथील गणेश घाट समोरील बंधारा नागरिकांच्या श्रमदानातून घालण्यात आला.कविलकाटे येथील पाचही वाडीतील लोकांनी आपल्या दैनंदिन जीवनातील बहुमोल असा वेळ देऊन पाणी अडवा पाणी जिरवा या भावनेतून एकत्र येत श्रमदान केले.लोकसहभागातून जलसंधारणाचे काम…

Read More

माणगाव हायस्कूलच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाने एकाच दिवसात बांधले तीन वनराई बंधारे

माध्यमिक विभागाने हेडगेवार प्रकल्प तर उच्च माध्यमिक विभागाने नाणेली काळकादेवी पुल व फॉरेस्ट वनक्षेत्र यक्षिणी मंदिर परिसर या ठिकाणी बांधले बंधारे. कुडाळ प्रतिनिधी:दुष्काळावर मात करण्यासाठी आणि पाणी आडवा पाणी जिरवा हा मूलमंत्र घेऊन महाराष्ट्र शासन कृषी विभाग आणि जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्यावतीने माणगाव हायस्कूलला दोन वनराई बंधारे बांधण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या या सूचनेचे पालन…

Read More

कविलकाटे ग्रामस्थांच्या श्रमदानातून जलसंधारण

गणेश घाटासमोर बांधला बंधारा. कुडाळ:कुडाळ शहरातील कविलकाटे येथे आज रविवारी दिनांक ११. १०.२०२६. रोजी काविलकाटे ग्रामस्थ, शेतकरी, नागरिक यांच्या श्रमदानातून कविलकाटे बाळकृष्ण नगर येथील गणेश घाट समोरील बंधारा नागरिकांच्या श्रमदानातून घालण्यात आला.कविलकाटे येथील पाचही वाडीतील लोकांनी आपल्या दैनंदिन जीवनातील बहुमोल असा वेळ देऊन पाणी अडवा पाणी जिरवा या भावनेतून एकत्र येत श्रमदान केले.लोकसहभागातून जलसंधारणाचे काम…

Read More
Back To Top