मा.आमदार वैभव नाईक यांच्या सतत लोक संपर्क आणि मतदारांमुळे माझा विजय:सौ अर्चना बंगे
कुडाळ प्रतिनिधी
हुमरमळा वालावल गावातील मतदारांनी ज्या अपेक्षेने मला विकासकामांसाठी मतदान केले आहे म्हणून गावातील विकास कामांसाठी आपले नेहमीच सहकार्य लाभेल असा विश्वास नवनिर्वाचित नेरुर मतदारसंघाचे जिल्हा परिषद सदस्य श्री रुपेश पावसकर यांनी व्यक्त केला
हुमरमळा वालावल ग्रामपंचायतीच्या वतीने जिल्हा परिषद सदस्य श्री रुपेश पावसकर व नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्या सौ अर्चना बंगे यांचा सन्मान सोहळा सरपंच श्री अमृत देसाई व उपसरपंच सौ रश्मी वालावलकर यांच्या शुभहस्ते शाल श्रीफळ देऊन करण्यात आला
यावेळी श्री पावसकर म्हणाले हुमरमळा वालावल गाव जगाच्या नकाशावर विकसीत गाव म्हणून नाव लौकिक झाले आहे आणि या पंचक्रोशीतील नेतृत्व श्री अतुल बंगे यांचे हुमरमळा वालावल गावाला मार्गदर्शन लाभल्याने ग्रामपंचायत सुध्दा यशाच्या शिखरावर पोचली याचे श्रेय ग्रामस्थांबरोबर सरपंच व ग्रामपंचायत सदस्य आणि विशेष मार्गदर्शनाच्या भुमिकेत असणा-या ग्रामसेविका अपर्णा पाटील म्हणुनच या ग्रामपंचायतीने पारदर्शक कारभार केला असे सांगून श्री पावसकर म्हणाले हुमरमळा वालावल गावातील विकासकामे करण्यावर आपला भर राहील असेही श्री पावसकर म्हणाले
मा आमदार वैभव नाईक यांचा जनसंपर्क आणि मतदारांचा पाठींबा – – – सौ अर्चना
सौ अर्चना बंगे म्हणाल्या आपले मार्गदर्शक श्री अतुल बंगे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मा आमदार वैभव नाईक यांच्या लोक प्रियतेमुळे व मतदारसंघातील मतदारांचा पाठींबा या ताकदीवरच आपण विजयी झालो कार्यकर्त्यांची मजबुत फळी व महीला वर्गांचा पाठबळ मिळाले त्या बद्दल गौरवोद्गार सौ बंगे यांनी काढुन नेरुर तर्फे हवेली दक्षिण मतदारसंघात जी गावे येतात तीथली विकास कामे मार्गी लावण्यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे सौ बंगे यांनी सांगितले
यावेळी सरपंच श्री अमृत देसाई, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष स्नेहल सामंत यांनीही विचार मांडले
यावेळी उपसरपंच सौ रश्मी वालावलकर, ग्रामपंचायत सदस्या सौ हेमांगी कद्रेकर, ग्रामपंचायत सदस्या सौ संजना गुंजकर, ग्रामसेविका अपर्णा पाटील, माजी सरपंच श्री सुरेश वालावलकर,पोलीस पाटील श्री सुबोध सावंत, ग्रामपंचायत सदस्या सौ प्रमोदीनी परब, माजी ग्रामपंचायत सदस्या श्रीमती रेणुका परब, जेष्ठ ग्रामस्थ शरद वालावलकर, जेष्ठ ग्रामस्थ विष्णु वालावलकर माजी ग्रामपंचायत सदस्य कांता माड्ये, ग्रामपंचायत कर्मचारी श्री अमित बंगे, ग्रामपंचायत कर्मचारी श्री शैलेश मयेकर, ग्रामपंचायत कर्मचारी कु जाई कद्रेकर आदी उपस्थित होते
