शेखर सुभेदार; नागरिकांच्या माध्यमातून सावंतवाडी वन विभागाकडे निवेदनाद्वारे मागणी…
सावंतवाडी
भटवाडी येथील लोकवस्तीजवळ वावरत
असलेल्या महाकाय मगरीचा वनविभागाने तातडीने योग्य तो बंदोबस्त करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. काजरकोंड पुलाजवळच्या पाण्यात गेल्या अनेक दिवसांपासून ७ ते ८ फूट लांबीची मगर ठिय्या मांडून आहे. त्यामुळे येथील शेतकरी आणि ग्रामस्थांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
येथील गावडे कुटुंबाची शेती आणि घराची वस्ती या पाण्याच्या अगदी जवळ आहे. आपली गुरेढोरे घेऊन शेतीकामासाठी त्यांना याच पाण्यातून जावे लागते, मात्र मगरीच्या सततच्या वास्तव्यामुळे जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. कोणताही धोकादायक प्रकार घडण्यापूर्वी प्रशासनाने हालचाल करावी. यासाठी शेखर सुभेदार यांनी उमेश गावडे, विकास सावंत, तेजस गावडे आणि समर्थ सुभेदार यांच्यासोबत वनविभागाला निवेदन दिले आहे. या मगरीला लवकरात लवकर सुखरूप पकडले जाईल, असे आश्वासन वनविभागाकडून ग्रामस्थांना देण्यात आले आहे.
