कुडाळ प्रतिनिधी:
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भंडारी समाजाची छान असलेले जिल्हा भंडारी भवनाचे स्वप्न साकार करण्यासाठी पालकमंत्री ना नितेश राणे यांनी आमच्या भंडारी समाजाला न्याय दीला असे गौरवोद्गार भंडारी समाजाचे नेते रमण वायंगणकर यांनी काढले
सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी समाज जिल्हा कार्यकारणी सभा कुडाळ येथील सिद्धिविनायक मंगल कार्यालयात झाली यावेळी श्री वायंगणकर बोलत होते
श्री वायंगणकर म्हणाले भंडारी समाजाला एकत्रित करण्याचें काम माजी आमदार कै बाली किनळेकर, काकासाहेब चमणकर यांच्या नेतृत्वाखाली झाले आणि आजही समाजाच्या माध्यमातून अनेक मेळावे व शैक्षणिक आणि युवकांना नोकरी मेळावे झाले परंतु जिल्हा भंडारी भवनाचे स्वप्न साकारण्याचे काम जिल्ह्यात धडाडीने काम करणारे पालकमंत्री ना नितेश राणे यांनी केले या पुढच्या काळात भंडारी समाज ना राणे यांचे मार्गदर्शन घेऊनच वाटचाल करील अशी ग्वाही श्री वायंगणकर यांनी दीली
यावेळी भंडारी समाजातील दीवंगत कणकवली येथील मनोहर पालयेकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली
तसेच तालुका भंडारी समाजाच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न झाले त्यां तालुक्यातील पदाधिकारी यांचे आभार मानले
तसेच विविध विषयांवर चर्चा करण्यात आली यावेळी जिल्हा अध्यक्ष श्री हेमंत करंगुटकर, उपाध्यक्ष सुनिल नाईक, जिल्हा सचिव भरतं आवळे, विकास वैद्य, आचरा चंदन पांगे,मालवण श्रीकांत वेंगुर्लेकर,आचरा प्रवीण आचरेकर,आचरा विजय पांगे, सावंतवाडी नंदकिशोर कोंडये, कुडाळ दर्शन कुडव, कुडाळ शरद पावसकर ,मातोंड विकास वैद्य आदी उपस्थित होते
