सिंधुदुर्गात गुन्हेगारांना पोलिसांचाच “वरदहस्त”,आ. निलेश राणे यांचा पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांच्यावर थेट हल्लाबोल..
सिंधुदुर्गनगरी:सिंधुदुर्ग जिल्ह्यात गुन्हेगारांना पोलिसांचेच अभय मिळत असून, कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे,असा आरोप करत शिवसेना आमदार निलेश राणे यांनी शनिवारी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. श्री दहिकर यांच्या कार्यकाळात जिल्ह्याचे प्रचंड नुकसान होत असल्याचे सांगत, त्यांची तातडीने हकालपट्टी करण्याची थेट मागणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांकडे करणार असल्याचे आमदार राणे…
