जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केला वैभववाडी तालुका दौरा
आंबा- काजू पंचनामे क्षेत्रभेट ग्रामीण रुग्णालयाला भेट देत घेतला सोयी सुविधांचा आढावा सिंधुदुर्गनगरी:जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी आज वैभववाडी परिसराचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी नगरपंचायत कामकाजाचा आढावा, जनगणना प्रशिक्षण मार्गदर्शन, ग्रामीण रुग्णालय भेट, आंबा-काजू पंचनामे क्षेत्रभेट अशा विविध कामांचा सखोल आढावा घेत मार्गदर्शन केले. सर्वप्रथम जिल्हाधिकाऱ्यांनी वाभवे–वैभववाडी नगरपंचायत कार्यालयाला भेट देत नगरपंचायतीच्या कामकाजाचा सविस्तर आढावा…
