विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमे अंतर्गत प्रगणना फॉर्मचे १०० टक्के डिजिटायझेशन पूर्ण करा: जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे
सावंतवाडी मतदार संघाची आढावा बैठक संपन्न सिंधुदुर्ग:विशेष सखोल पुनरिक्षण (SIR)-२०२६ मोहिमेअंतर्गत सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील Enumeration Forms चे डिजिटायझेशन आणि संबंधित कामे विहित वेळेत शंभर टक्के पूर्ण करावीत, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिले. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील मतदार नोंदणी अधिकारी, वेंगुर्ला, सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यातील सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तसेच…
