

बांदीवडे येथे अनधिकृत वाळू वाहतूक करताना तीन डंपर जप्त..
मसुरे प्रतिनिधीबांदिवडे मळावाडी येथे शनिवार दिनांक नऊ ऑगस्ट रोजी संध्याकाळी उशिरा अनधिकृत वाळू वाहतूक करत असलेले तीन डंपर पोलीस प्रशासन व महसूल विभाग यांनी संयुक्तरित्या कार्यवाही करून जप्त केले असून सदरचे तिन्ही डंपर मसुरे पोलीस दुरक्षेत्र येथे आणण्यात आले होते. याबाबत आचरा पोलीस ठाणे येथे एफ आय आर दाखल करण्यात आला. दोन दिवसांपूर्वीच याच भागातील…

माध्यमिक शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार रखडले
माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी- भरत केसरकर,नंदन घोगळे,सलिम तकीलदार यांची मागणी सिंधुदुर्ग प्रतिनिधीऑगस्ट महिना अर्धा उलटून गेला असून नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन सारखा सण पण होवून गेला, तरी पण माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक आणी शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे पगार अद्यापही झालेले नाहीत. श्रावण महिन्यातील ऐन सणासुदीच्या काळात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार न झाल्यामुळे त्यांचे हे महत्त्वाचे…

सावंतवाडीजवळ एसटी बसखाली चिरडून दुचाकीस्वाराचा मृत्यू
कोलगाव येथील घटना,सावंतवाडी पोलीस तपास करत आहेत सावंतवाडी प्रतिनिधीसावंतवाडी- कुडाळ मार्गावरील कोलगावआयटीआयजवळ जुन्या मुंबई-गोवा महामार्गावर एका दुचाकीस्वाराचा एसटी बसच्या चाकाखाली चिरडून जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना आज दुपारी सव्वा चार वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात मृतदेहाची ओळख पटवणे कठीण झाले आहे, कारण एसटीचे चाक चेहऱ्यावरून गेल्यामुळे चेहरा पूर्णपणे छिन्नविछिन्न झाला आहे. अपघातानंतर घटनास्थळी…

जिल्हात फक्त काही दिवसापुरतात मटका जुगार बंद,खुद्द सत्ताधाऱ्यांच्याच आशीर्वादामुळे सर्व अवैध धंदे खुलेआम सुरू
गेली पंधरा वर्षे महामार्ग पूर्णत्वास जात नाही ही खरी शोकांतिका परशूराम उपरकर;खड्डे बुजविण्याच्या नावे केवळ सिंधुदुर्गवासीयांची दिशाभूल सुरू कणकवली प्रतिनिधीसिंधुदुर्ग जिल्ह्यात मटका, जुगार, ड्रग्ज, गांजा आणि अवैध दारू विक्री जोरात सुरू असून या सर्व अनैतिक धंद्यांना सत्ताधाऱ्यांचे अभय आहे,” असा गंभीर आरोप माजी आमदार आणि शिवसेना नेते परशूराम उपरकर यांनी आज केला. तसेच सर्व रस्त्यांची…

पोलिस ठाण्यातील दिरंगाई विरोधात ७ ऑगस्टला जयंत बरेगार यांचे उपोषण
कुडाळ प्रतिनिधीयेथील पोलिस ठाण्यातील दिरंगाई आणि तपासामध्येचालढकल होत असल्याच्या निषेध करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते जयंत बरेगार यांनी उद्या ७ ऑगस्ट पासून जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला आहे. बरेगार यांनी ७ एप्रिल २०२१ ला कुडाळ पोलिसांत तक्रार दाखल केली होती, परंतु तब्बल १३ महिन्यांनी, १३ मे २०२२ ला या प्रकरणात एफआयआर नोंदवण्यात आला. तत्कालीन…

शासकीय जागेवरील देशद्रोही आरोपींची दुकाने त्वरित हटवा
सकल हिंदू समाज जिल्हाध्यक्ष सीताराम गावडे यांची मागणी सिंधुदुर्ग,प्रतिनिधी१ ऑगस्ट २०२५साटेली-भेडशी गावातील बाजारपेठेत शासकीय जागेवर अतिक्रमण करून चालवण्यात येणाऱ्या दुकानदारांविरोधात सकल हिंदू समाजाने तीव्र आंदोलनाची भूमिका घेतली आहे. यासंदर्भात सकल हिंदू समाजाचे जिल्हाध्यक्ष सीताराम गावडे यांनी प्रशासनाला ठणकावून इशारा दिला असून, “देशद्रोही कृत्य करणाऱ्या संबंधितांची दुकाने आठ दिवसात जमीनदोस्त करा, अन्यथा आम्ही हिंदू समाज ते…

देवगड येथे दुर्ग मावळा प्रतिष्ठान व दुर्ग रक्षक प्रतिष्ठान रेडी यांच्यामार्फत इतिहासाची साधने व प्रदर्शन कार्यक्रमाचे आयोजन
देवगड प्रतिनिधीतालुक्यातील शेठ म.ग हायस्कूल देवगड आणि अ. कृ.केळकर हायस्कूल वाडा येथे दुर्ग मावळा प्रतिष्ठान व दुर्ग रक्षक प्रतिष्ठान रेडी यांच्या सहकार्याने इतिहासाची साधने व प्रदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.इतिहास अभ्यासक व दुर्ग मावळा सदस्य ज्ञानेश्वर राणे यांचे इतिहासाची साधने यावर व्याख्यान व प्रदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमांमध्ये राणे यांनी विद्यार्थ्यांना धोप, तलवार,वक्रधोप,…

युवा पत्रकार सिद्धेश सावंत यांचा व्हॉइस ऑफ मीडियाकडून स्नेह सत्कार
रोट्रॅक्ट क्लब ऑफ सावंतवाडीच्या अध्यक्षपदी सिद्धेश सावंत यांची स्तुत्य निवड सावंतवाडी प्रतिनिधीरोट्रॅक्ट क्लब ऑफ सावंतवाडीच्या अध्यक्षपदी व्हॉईस ऑफ मीडियाचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष व युवा पत्रकार सिद्धेश सावंत यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या स्तुत्य निवडीबद्दल व्हॉईस ऑफ मीडिया सिंधुदुर्ग जिल्हा संघटनेकडून त्यांचा आज स्नेहसत्कार करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ सल्लागार राजेश नाईक यांच्या हस्ते सिद्धेश…

माणुसकीची जाणीव असणारा नेता म्हणजे आमदार निलेश राणे
राणे कुटुंबाला आपला शत्रू मानण्याआधी त्यांचे मुस्लिम समाजासाठी असलेले योगदान पहा. राणे प्रतिष्ठानचे मेडिकल अध्यक्ष सलमान गांगू यांचे कोकणातील मुस्लिम समाजाला आवाहन.. मुंबई प्रतिनिधीराणे कुटुंबीय हे मुस्लिम समाजाचे शत्रू नसून वेळप्रसंगी ते अनेकदा मुस्लिम समाजाच्या मदतीला धाऊन गेले आहेत. त्यामुळे राणे कुटुंबीयांना आपले शत्रू मानण्यापूर्वी त्यांचे मुस्लिम समाजासाठी असणारे योगदान देखील जाणून घ्या असे आवाहन…

संदीप गावडे यांच्याकडून सावंतवाडी नगरपरिषदेतील आरोग्यदूतांना रेनकोट वाटप
सावंतवाडी प्रतिनिधीआपला वाढदिवस साजरा करण्याच्या निमित्ताने, सामाजिक बांधिलकी जपत संदीप गावडे यांनी सावंतवाडी नगरपरिषदेच्या आरोग्यदूतांना (सफाई कर्मचाऱ्यां) रेनकोट वाटप केले. पावसाळ्यात नागरिकांचे आरोग्य जपण्यासाठी रस्त्यावर उतरून काम करणाऱ्या य कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गावडे यांनी हा उपक्रम राबवला. यावेळी गेळे सरपंच सागर ढोकरे, माजी नगरसेवक आनंद नेवगी, दिपक म्हापसेकर, भाई राणे हे उपस्थित होते. त्यांनी…
s00guh