कॅनव्हासऐवजी वीणेवर साकारले श्रीविठ्ठल-रुक्मिणीचे देखणे रूप!

सिंधुदुर्गच्या सूक्ष्मचित्रकार श्रुती सुतार हिचा भक्ती आणि कलेचा अनोखा संगम वैभववाडी:आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर वारकरी संप्रदायात अलोट उत्साह असतो. याच भक्तीमय वातावरणात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गडमठ (ता. वैभववाडी) येथील चित्रकार श्रुती संतोष सुतार हिने आपल्या अनोख्या कल्पकतेतून विठ्ठलभक्तीचा सुरेख आविष्कार घडवला आहे. पारंपरिक कॅनव्हासला फाटा देत श्रुतीने चक्क वारकऱ्यांच्या भक्तीचे आणि नामस्मरणाचे प्रतीक असलेल्या ‘वीणे’वर भगवान…

Read More

दोन वेळा शेतकरी कर्जमुक्ती देणारे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या इतिहासातील एकमेव मुख्यमंत्री;मंत्री नितेश राणे

कर्जमाफी वीज माफी मुळे शेतकऱ्यांना फार मोठा दिलासा कणकवली प्रतिनिधी:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने राज्यात प्रथमच दोन वेळा शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्ती जाहीर केली असून, महाराष्ट्राच्या इतिहासात दोन वेळा शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देणारे देवेंद्र फडणवीस हे एकमेव मुख्यमंत्री असल्याचे मत्स्योद्योग व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी केला. ४८ हजार कोटी रुपयांची शेतकऱ्यांची…

Read More

मनाई आदेशभंग प्रकरणी नाम.नितेश राणे, आम.प्रमोद जठार यांच्यासह सर्व १६ जणांची निर्दोष मुक्तता

पाकिस्तानचे तत्कालीन परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे केले होते दहन वकील राजेश परुळेकर व वकील ओंकार परुळेकर यांनी न्यायालयात पाहिले काम कणकवली प्रतिनिधी : डिसेंबर २०२२ मध्ये पाकिस्तानचे तत्कालीन परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानाच्या निषेधार्थ कणकवली येथे झालेल्या आंदोलनप्रकरणी दाखल…

Read More

पालकमंत्री नितेश राणे शेतकऱ्यांच्या बांधावर;पावसाअभावी संकटात सापडलेल्या शेतकऱ्याच्या जाणून घेतल्या व्यथा

कणकवली:जिल्हातील पाऊस एकाकी गायब झाल्याने शेतात जमिनीला भेगा व भातशेती सुकल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. पावसाने मोठी विश्रांती घेतल्याने जिल्हातील विविध भागात जमीन सुकून भेगा पडण्याबरोबर भाताची रोपेही करपायला लागली असल्याने मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा पालकमंत्री ना.नितेश राणे यानी कणकवली तालुक्यातील तळेरे वाघाचीवाडी येथे प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यावेळेस माजी…

Read More

कै.श्रीधरराव नाईक यांच्या ३५ व्या स्मृतिदिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

कणकवली प्रतिनिधी:समाजकार्य, शेतकरी हित आणि जनसेवेचा वारसा जपणारे कै. श्रीधरराव नाईक यांच्या ३५ व्या स्मृतिदिनानिमित्त सोमवार दि. २२ जून २०२६ रोजी कणकवली येथील कै. श्रीधरराव नाईक चौक येथे विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हा स्मृतिदिन कार्यक्रम कै. श्रीधरराव नाईक फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आला असून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात…

Read More

मोदींच्या नेतृत्वाखाली तुष्टीकरणाचा अंत, हिंदू अस्मितेचा उदय : पालकमंत्री नितेश राणे

राष्ट्र प्रथम म्हणूनच मोदींच्या १२ वर्षांच्या कारकिर्दीत देश सर्वात सुरक्षित! कणकवली प्रतिनिधी:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अभूतपूर्व आणि यशस्वी कारकिर्दीला १२ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा पालकमंत्री तथा राज्याचे मत्स्य व बंदरविकास मंत्री नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांच्या निर्णय आणि परिवर्तनाचा लेखाजोखा मांडला. २०१४ पूर्वी देशात असलेल्या असुरक्षिततेच्या वातावरणातून मोदींनी देशाला बाहेर काढत जागतिक…

Read More

बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशाचा ७ लाखाचा सोनी कंपनीचा कॅमेरा आणि लेन्स लंपास

कणकवली प्रतिनिधी:गोवा ते मुंबई आराम बसमधून प्रवासकरणाऱ्या प्रवाशाचा ७ लाखाचा सोनी कंपनीचा कॅमेरा आणि लेन्स चोरीस गेल्या आहेत. महामार्गावर नांदगाव येथे आराम बस जेवणासाठी थांबली होती. यावेळी त्या प्रवाशाच्या बॅगमधील वस्तू अज्ञाताने लांबवल्या. ही घटना ३० मे रोजी रात्री दहाच्या सुमारास घडली. मुंबईतील अंधेरी पूर्व येथे राहणारा सूरज विनोद सिंग (वय २९) हा पर्यटनासाठी गोवा…

Read More

अतिक्रमणे हटवायची असतील तर सर्वांची हटवा केवळ नरडवे रोडवरील स्टॉल धारकांवर अन्याय नको

कणकवलीतील अतिक्रमण हटाव मोहिमेवरून मा.आ.वैभव नाईक आक्रमक कणकवली प्रतिनिधी:कणकवली नगरपंचायतच्या मुख्याधिकारी गौरी पाटील यांच्या आदेशानुसार कणकवली शहरातील नरडवे रोडवरील श्रीधर नाईक चौक ते म्हसकर हॉस्पिटल पर्यंत असलेले स्टॉल व दुकाने हटविण्यात येणार असल्याच्या सूचना नगरपंचायतीने सोमवारी स्पिकरवरून जाहीर केल्या होत्या. केवळ नरडवे रोडवरील अतिक्रमणे हटविण्याची सूचना मुख्याधिकाऱ्यांनी दिल्याने माजी आमदार, शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी…

Read More

खासदार नारायण राणे यांच्या प्रयत्नांतून हॉर्मुझमध्ये अडकलेले ११ मराठी युवक सुखरूप मायदेशी

कणकवलीइराण इस्रायल युद्धात इराकच्या जरबो बोटीवर हॉर्मुझ समुद्रधुनीत अडकलेल्या महाराष्ट्र राज्यातील ११ कर्मचाऱ्यांना खासदार नारायण राणे यांच्या प्रयत्नातून सुखरूप भारतात घरी आणण्यात आले आहे. या बोटीवर मालवण तालुक्यातील दांडी येथील प्रतीक प्रवीण खोचरेकर हा 23 वर्षे युवक अडकला असल्याची माहिती त्याच्या नातेवाईकांनी खासदार राणे यांना सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना लक्षात आणून दिली होती.त्यानंतर या घटनेचे…

Read More

रायगड दक्षिण जिल्हा प्रभारीपदी ना. नितेश राणे यांची नियुक्ती

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी जाहीर केली प्रभारींची यादी कणकवली प्रतिनिधीसिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच राज्याचे मत्स्य उद्योग व बंदर विकास मंत्री आणि भाजपाचे प्रखर हिंदुत्ववादी नेते ना. नितेश राणे यांची रायगड दक्षिण जिल्हा प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी नुकतीच जिल्हा प्रभारींची यादी जाहीर केली असून त्यामध्ये ना. नितेश राणे यांच्याकडे…

Read More
Back To Top