बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशाचा ७ लाखाचा सोनी कंपनीचा कॅमेरा आणि लेन्स लंपास

कणकवली प्रतिनिधी:
गोवा ते मुंबई आराम बसमधून प्रवासकरणाऱ्या प्रवाशाचा ७ लाखाचा सोनी कंपनीचा कॅमेरा आणि लेन्स चोरीस गेल्या आहेत. महामार्गावर नांदगाव येथे आराम बस जेवणासाठी थांबली होती. यावेळी त्या प्रवाशाच्या बॅगमधील वस्तू अज्ञाताने लांबवल्या. ही घटना ३० मे रोजी रात्री दहाच्या सुमारास घडली.

मुंबईतील अंधेरी पूर्व येथे राहणारा सूरज विनोद सिंग (वय २९) हा पर्यटनासाठी गोवा येथे गेला होता. ३० मे रोजी खासगी आराम बसमधून तो मंबईला निघाला होता. नांदगाव येथील हॉटेल ग्रीनफिल्ड येथे रात्री १० च्या सुमारास जेवणासाठी बस थांबली होती. त्याचा फायदा घेत अज्ञाताने बसमध्ये चढून सूरज सिंग याच्या बॅगमधील सोनी कंपनीचा कॅमेरा आणि त्याची लेन्स चोरून नेली. मुंबईला पोचल्यानंतर सुरज यांनी अंधेरी येथे चोरीची तक्रार दिली. मात्र घटना कणकवली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असल्याने तपास येथील पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top