सिंधुदुर्गात हृदयशस्त्रक्रियेचा नवा अध्याय! पडवे SSPM मध्ये एओर्टिक व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट यशस्वी

राणेंच्या SSPM मेडिकल कॉलेज अँड लाइफटाइम हॉस्पिटल, पडवे येथे वैद्यकीय क्षेत्रातील ऐतिहासिक कामगिरी;डॉ.अमृतराज नेर्लीकर यांच्या नेतृत्वाखाली शस्त्रक्रिया यशस्वी

सिंधुदुर्ग प्रतिनिधी

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या आरोग्यसेवेच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण पाऊल टाकत SSPM मेडिकल कॉलेज अँड लाईफटाईम हॉस्पिटल, पडवे येथे एओर्टिक व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट (Aortic Valve Replacement) ही महत्त्वपूर्ण हृदयशस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली. प्रगत हृदयविकार उपचारांच्या दृष्टीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ही उल्लेखनीय कामगिरी मानली जात आहे.
या शस्त्रक्रियेमुळे जिल्ह्यातील रुग्णांना अत्याधुनिक हृदयविकार उपचारांसाठी इतर मोठ्या शहरांवर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही. पुणे,मुंबई, गोवा,कर्नाटक, अशा ठिकाणी जावे लागणार नाही.तेव्हढ्याच दर्जाचे उपचार आता पडावे लाईफटाईम हॉस्पिटल मध्ये मिळत आहेत. स्थानिक पातळीवर प्रगत वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याच्या SSPM हॉस्पिटलच्या प्रयत्नांना यामुळे बळ मिळाले आहे.
ही शस्त्रक्रिया डॉ. अमृतराज नेर्लीकर (कार्डियाक सर्जन) यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. त्यांना डॉ. विनायक माळी (कार्डियाक अ‍ॅनेस्थेशिया) आणि संपूर्ण वैद्यकीय व शस्त्रक्रिया पथकाने सहकार्य केले.
या शस्त्रक्रियेसाठी कार्यरत पथकामध्ये डॉ. मिलिंद (असिस्टंट), श्री. रोहित (ब्रदर), श्री. प्रणय (परफ्युजनिस्ट), श्रीमती कविता ओरोसकर (ओटी इन्चार्ज), मिस कविता वातेगावकर (स्टाफ नर्स), मिस अक्षता राणे, श्री. सुशांत बांदेकर, श्री. अनिकेत बास्वर व श्री. जगन्नाथ केरकर (ओटी टेक्निशियन), श्री. दिव्यकांत वेंगुर्लेकर व श्री. चेतन तारकर (सपोर्ट स्टाफ), श्री. नागेश व श्री. सुनीत अडारकर (वॉर्ड बॉय) तसेच सुदेश्ना गावंकर (वॉर्ड असिस्टंट) यांचा समावेश होता.
या यशस्वी शस्त्रक्रियेसाठी संपूर्ण वैद्यकीय, नर्सिंग, तांत्रिक आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांनी समन्वयाने काम केले.
कोकणातील रुग्णांना दर्जेदार, आधुनिक आणि प्रगत आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या दिशेने SSPM मेडिकल कॉलेज अँड लाईफटाईम हॉस्पिटल, पडवे यांची ही कामगिरी महत्त्वपूर्ण ठरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top