वर्देत महाविद्यालयीन युवतीची चाकूने भोसकून हत्या.

कुडाळ:
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वर्दे येथे दामिनी किरण पालव (वय २३) या महाविद्यालयीन युवतीची चाकूने वार करून निघृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना शनिवारी (ता. १७) सायंकाळी घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, हत्येनंतर आरोपी फरार झाला आहे. त्याच्या शोधासाठी सिंधुदुर्ग जिल्हा पोलिसांनी सहा पथके तैनात केली होती जिल्ह्यात विविध ठिकाणी नाकाबंदी करून 24 तासात आरोपीच्या मुसक्या आवळल्या.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दामिनी किरण पालव ही हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेत होती. शनिवारी सायंकाळी सुमारे ५.३० ते ६ वाजण्याच्या दरम्यान ती कडावल येथील बसस्थानकावर उतरून वर्दे येथील आपल्या घराच्या दिशेने पायी जात होती. याच दरम्यान वाटेत तिच्यावर चाकूने वार करून तिची हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहिकर आणि अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांनी घटनास्थळी धाव घेतली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तपास सुरू करण्यात आला होता.

आरोपीच्या शोधासाठी सहा पोलीस पथके तैनात

फरार आरोपीला पकडण्यासाठी सहा पोलीस पथके कार्यरत आहेत. ओरोस येथील जिजामाता सर्कलसह जिल्ह्यातील महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती. हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
या घटनेमुळे वर्दे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top