सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी घेतली सतेज ऊर्फ बंटी पाटील यांची घेतली भेट

कोल्हापूरच्या गोकुळ दुध संघात मिळवलेल्या यशा बद्दल केले अभिनंदन

कोल्हापूर:
कोल्हापूर येथील गोकुळ दुधसंघ ज्याची निवडणूक महायूतीने प्रतिष्ठेची केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः या निवडणूकीत लक्ष घालून महायुतीचे उमेदवार ठरवले होते. कोल्हापूरचे पालकमंत्री, भाजपचे जेष्ठ मंत्री चंद्रकांत पाटील, हसन मुश्रीफ, महाडीक कंपनी, दहा आमदार, एक खासदार सगळे एक होऊन महायुतीची सत्ता गोकुळ दुधसंघावर आणण्याचा चंग बांधला होता. तर दुसऱ्या बाजूला काँग्रेसचे आमदार विधानपरिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील एकटे वाघासारखे लढले व महायुतीच्या दिग्गजांचा पराभव केला.
बंटी पाटील साहेबांच्या या यशाबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी गगनबावडा येथे बंटी पाटील साहेबांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. हा फक्त निवडणुकीचा विजय नाही, तर कोल्हापूरच्या मातीतल्या आपल्या निस्वार्थ कार्याचा,गेली अनेक वर्षे आपण जपलेल्या जनसंपर्काचा आणि सर्वसामान्य शेतकरी, दूध उत्पादकाच्या मनात असलेल्या आपल्याबद्दलच्या अतूट विश्वासाचा विजय आहे.
महायुतीच्या एवढ्या मोठ्या ताकदीसमोर, सत्ता आणि यंत्रणा समोर असताना आपण एकट्याने जे लढून दाखवलं,तमाम दिग्गजांना आपण जे पाणी पाजलं,त्याला खरच तोड नाही. आपण सिद्ध करून दाखवलं की कोल्हापूरचा गड अजूनही अभेद्य आहे आणि त्यावर फक्त बंटी पाटील साहेबांचाच झेंडा फडकणार.
साहेब, आपली लढाऊ वृत्ती, संकटातही डगमगून न जाता कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहण्याची आपली ताकद आणि विकासाची आपली दृष्टी यामुळेच आजचा हा दिवस पाहायला मिळाला. आपल्या या विजयाने आम्हा सर्व कार्यकर्त्यांमध्ये नवी ऊर्जा संचारली आहे. आपल्या नेतृत्वाखाली गोकुळ नक्कीच आणखी प्रगती करेल याची आम्हाला खात्री आहे अशा भावना सिंधुदुर्गातील पदाधिकाऱ्यांनी बंटी पाटील यांचे अभिनंदन करताना व्यक्त केल्या. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस साईनाथ चव्हाण, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, प्रदेश प्रतिनिधी प्रकाश जैतापकर, उपाध्यक्ष नागेश मोर्ये,विजय प्रभू,सरचिटणीस रविंद्र म्हापसेकर,प्रविण वरुणकर, विनायक मेस्त्री, कुडाळ तालुकाध्यक्ष अभय शिरसाट, कणकवली तालुकाध्यक्ष प्रदिप मांजरेकर, सावंतवाडी तालुकाध्यक्ष अभय मालवणकर, दोडामार्ग तालुकाध्यक्ष बाबू गवस, वैभववाडी तालुकाध्यक्ष भालचंद्र जाधव, मालवण तालुकाध्यक्ष जेम्स फर्नांडिस, जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष किरण टेंबुलकर, सिंधुदुर्ग जिल्हा बॅंक संचालक विद्याप्रसाद बांदेकर, मेघनाद धुरी, व्हि.के. सावंत, सुंदर सावंत, मंदार शिरसाट, तबरेज शेख, उल्हास शिरसाट, सखाराम खोचरे,सोनल सावंत, सुंदरवल्ली पडियाची, पीटर फर्नांडिस इत्यादी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top