आडाळी एमआयडीसीत अवैध खनिज उत्खनन; ठाकरे शिवसेनेचा तीव्र आंदोलनाचा इशारा
प्रशासनाच्या दुर्लक्षाविरोधात कुडाळ एमआयडीसी कार्यालयात निवेदन सादर; सखोल चौकशीची मागणी दोडामार्ग प्रतिनिधी:तालुक्यातील आडाळी एमआयडीसी परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध खनिज उत्खनन सुरू असून प्रशासन याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. या बेकायदेशीर उत्खननाविरोधात सावंतवाडी विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ आणि दोडामार्ग तालुकाप्रमुख संजय गवस यांच्या नेतृत्वाखाली…
