सावंतवाडीत औदुंबर स्वामी मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात संपन्न
सावंतवाडी:पोलीस स्टेशनच्या समोर नूतन बांधण्यात आलेल्या औदुंबर स्वामी मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा अत्यंत मंगलमय आणि भक्तीमय वातावरणात पार पडला. या सोहळ्यामुळे संपूर्ण पोलीस ठाणे परिसर स्वामींच्या जयघोषाने आणि भक्तीरसात न्हाऊन निघाला होता. सावंतवाडीचे पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या हस्ते स्वामी समर्थांच्या मूर्तीची विधिवत आणि शास्त्रोक्त पद्धतीने प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी त्यांच्या पत्नीनेही पूजेचा मान भूषविला. या…
