सावंतवाडीत औदुंबर स्वामी मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात संपन्न

सावंतवाडी:
पोलीस स्टेशनच्या समोर नूतन बांधण्यात आलेल्या औदुंबर स्वामी मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा अत्यंत मंगलमय आणि भक्तीमय वातावरणात पार पडला. या सोहळ्यामुळे संपूर्ण पोलीस ठाणे परिसर स्वामींच्या जयघोषाने आणि भक्तीरसात न्हाऊन निघाला होता. सावंतवाडीचे पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या हस्ते स्वामी समर्थांच्या मूर्तीची विधिवत आणि शास्त्रोक्त पद्धतीने प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी त्यांच्या पत्नीनेही पूजेचा मान भूषविला.

या मंगलमयी प्रसंगी सावंतवाडी वन विभागाचे उपवनसंरक्षक मिलीश शर्मा, उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे, वनक्षेत्रपाल सुहास पाटील, पोलीस उपनिरीक्षक पंकज शिंदे आणि जयेश खंदरकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. कार्यक्रमाची सुरुवात पहाटे मंत्रघोषाने करण्यात आली, ज्यामुळे वातावरण अत्यंत चैतन्यमयी बनले होते. मूर्तीची प्रतिष्ठापना झाल्यानंतर दिवसभर भजन, कीर्तन आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याचे दर्शन घेण्यासाठी सावंतवाडीतील स्थानिक नागरिक आणि स्वामी भक्तांनी मोठी गर्दी केली होती.

या मंदिराच्या उभारणीत मोलाचे सहकार्य करणाऱ्या व्यक्तींचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला. यामध्ये भोसले नॉलेज सिटीचे कार्याध्यक्ष अच्युत भोसले, उद्योजक शैलेश पै, शैलेश नाबर, पंचायत समिती सदस्य जितू गावकर, वेत्ये सरपंच गुणाजी गावडे, शासकीय ठेकेदार प्रताप मूर्ती, उद्योजक अमित आसोलकर, अनिकेत आसोलकर, श्रेयस मुंज, गौरेश सावंत, अरविंद सावंत, मुन्ना मुद्राळे, संदेश परब, विशाल सावंत, गौरव दळवी तसेच पोलीस कर्मचारी अमित राऊळ, मनोज राऊत, हनुमंत धोत्रे आणि गौरेश राणे यांचा समावेश होता.

कार्यक्रमाचे औचित्य साधून राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी मंदिराला भेट देऊन श्रींचे दर्शन घेतले. यामध्ये उपनगराध्यक्ष अनिल निरवडेकर, भाजप युवा नेते विशाल परब, माजी नगराध्यक्ष संजू परब, बबन साळगावकर, जिल्हा बँक सदस्य विद्याधर परब आणि सुरेश भोगटे आदी मान्यवर उपस्थित होते.

हा संपूर्ण सोहळा यशस्वी करण्यासाठी उत्सव समितीच्या अमोल टेबकर, भुवन नाईक, अक्षय माशाळ, सचिन मोरजकर, हेमंत पांगम, आनंद काष्टे, आर्या टेंबकर, ओम टेबकर, निरंजन सावंत, निखिल माळकर, नारायण पेंडुरकर, अभिषेक लाखे, प्रज्वल राऊत आणि चंद्रकांत धोत्रे यांनी अथक परिश्रम घेतले.
हा संपूर्ण सोहळा यशस्वी करण्यासाठी उत्सव समितीच्या अमोल टेंबकर , भुवन नाईक, अक्षय माशाळ, सचिन मोरजकर, हेमंत पांगम, आनंद काष्टे, आर्या टेंबकर, ओम टेबकर, निरंजन सावंत, निखिल माळकर, नारायण पेंडुरकर, अभिषेक लाखे, प्रज्वल राऊत आणि चंद्रकांत धोत्रे यांनी अथक परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top