बाकरवाडी येथे श्री देव वंशेश ब्राह्मण मंदिराचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

भाजप युवा नेते विशालजी परब यांची प्रमुख उपस्थिती; परिसराच्या सुख-समृद्धीसाठी साकडे

सावंतवाडी:
श्री देव वेतोबा सातेरी, श्री देव गिरोबा सातेरी आणि श्री देव वंशेश ब्राह्मण यांच्या आशीर्वादाने बाकरवाडी येथील श्री देव वंशेश ब्राह्मण मंदिर ट्रस्टच्या वतीने मंदिराचा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या मंगलमयी सोहळ्याचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या श्री सत्यनारायण महापूजेला भाजपचे धडाडीचे युवा नेते विशालजी परब यांनी उपस्थित राहून देवाचे दर्शन घेतले.

यावेळी विशालजी परब यांनी महापूजेचा लाभ घेतला आणि श्री चरणी नतमस्तक होऊन परिसराच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली. मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित या धार्मिक कार्यक्रमामुळे संपूर्ण परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.

विशालजी परब यांच्यासोबत भाजपचे विविध पदाधिकारी आणि बाकरवाडी परिसरातील स्थानिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. परब यांनी यावेळी उपस्थित ग्रामस्थांशी संवाद साधला आणि मंदिर ट्रस्टच्या कार्याचे कौतुक केले. स्थानिक कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात त्यांचे स्वागत केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top