निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र पडताळणीचा आढावा
सिंधुदुर्ग:कुणबी, मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र मिळण्यास पात्र व्यक्तींना प्रमाणपत्र देण्याच्या अनुषंगाने गठित समितीची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील तारिणी सभागृहात निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली काल दि.२३ रोजी पार पडली. या बैठकीत जात प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रियेतील विविध प्रकरणांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. या बैठकीस जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष…
