आडाळी एम.आय.डी.सी.च्या भूखंड वाटपावरील स्थगिती उठवली; प्रस्तावित गोल्फ कोर्स प्रकल्प अखेर रद्द
उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत विधान भवनात महत्त्वाची बैठक संपन्न मुंबई:सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील आडाळी औद्योगिक वसाहतीमधील (एम.आय.डी.सी.) प्रलंबित समस्या सोडवण्यासाठी आणि स्थानिक उद्योगधंद्यांना गती देण्यासाठी आज विधान भवन येथे एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली आणि सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर यांच्या आग्रही मागणीवरून व प्रमुख उपस्थितीत…
