सह्याद्रीच्या रक्षणासाठी ३० नोव्हेंबरपासून ‘पारगड ते रायगड’ जागरण यात्रा
पंप स्टोरेज आणि शक्तिपीठ महामार्गविरोधात एल्गार; पहिल्या टप्प्यात पारगड ते पन्हाळगड प्रवास सावंतवाडी:पश्चिम घाटातील समृद्ध जैवविविधता, जलस्रोत आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक वारसा वाचवण्यासाठी येत्या ३० नोव्हेंबरपासून ‘सह्याद्रीच्या रक्षणासाठी – पारगड ते रायगड जागरण यात्रा’ काढण्यात येणार आहे. या यात्रेच्या पहिल्या टप्प्यात पारगड ते पन्हाळगड असा प्रवास होणार असून, या मोहिमेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निसर्गप्रेमी, साहित्यिक…
