नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त वागदे गोपुरीत बोअरवेल खोदाई..
सरपंच संदीप सावंत यांच्या पुढाकारातून ग्रामस्थांना पाणीटंचाईतून दिलासा.. कणकवली प्रतिनिधीमाजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त वागदे गोपुरी वसाहत येथे पिण्याच्या पाण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यात आला. वागदे ग्रामपंचायत व सरपंच संदीप सावंत यांच्या पुढाकारातून या भागात विंधन विहीर (बोअरवेल) खोदाई करून ग्रामस्थांना दिलासा देण्यात आला.
