आजगांव पंचक्रोशीत भाजपा युवानेते विशालजी परब यांच्या तर्फे शालेय साहित्य वाटपाचा शुभारंभ
सावंतवाडी:शिक्षणाला प्रोत्साहन देत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन महाराष्ट्र भाजपा युवानेते विशालजी परब यांच्या तर्फे आजगांव पंचक्रोशीत शालेय साहित्य वाटप उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. या उपक्रमाची सुरुवात आजगांव जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करून करण्यात आली. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध व्हावे आणि त्यांच्या शिक्षणाला बळ मिळावे, या उद्देशाने हा…
