सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या नोकर भरती मधील उमेदवारांची परिक्षा दि.२८ फेब्रुवारी २०२६ रोजी जाहीर
सिंधुदुर्ग:सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.,सिंधुदुर्ग या आस्थापनेवरील व अधिपत्याखाली असलेल्या लिपिक या श्रेणीतील ७३ रिक्त पदे सरळ सेवा पद्धतीने भरावयाची आहेत. त्यासाठीची भरती प्रक्रिया आय.बी.पी.एस (इन्स्टिट्यूट बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन) या संस्थेमार्फत राबवली जात आहे.सदरची परिक्षा जिल्ह्यातील विविध निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे घेतली गेली नव्हती.सदर परीक्षेची तारीख आय.बी.पी.एस कंपनीकडून दि.२८ फेब्रुवारी २०२६ अशी निश्चित करण्यात आलेली आहे….
