संविधान दिनानिमित्त सिंधुदुर्ग किल्ल्यावर स्वच्छता अभियान
आमदार दीपक केसरकर, निलेश राणे,संजू परब यांच्यासह शिवसेना पदाधिकाऱ्यांची उपस्थिती; संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन सावंतवाडी:संविधान दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने मालवण येथील ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ल्यावर गड-किल्ले स्वच्छता व संवर्धन अभियान राबविण्यात आले. या अभियानाचा लोकार्पण सोहळा, संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन आणि स्वच्छता अभियान असा संयुक्त कार्यक्रम उत्साहात पार पडला.
