

भारतीय जनता पार्टी माणगाव शहराची सभा तालुकाध्यक्ष संजय वेंगुर्लेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न…
कुडाळ अल्पसंख्याक अध्यक्ष पदी जोसेफ डाॅक्टस यांची नियुक्ती.. कुडाळ प्रतिनिधीभारतीय जनता पार्टी माणगाव शहराची सभा आयोजित करण्यात आली होती.सभेमध्ये विविध विषयांवर चर्चा संघटनात्मक बांधणी संदर्भ विचारविनिमय करण्यात आला. तालुका अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले पुढील काही महिन्यांत नगरपंचायत,जिल्हा परिषद,पंचायत समिती ग्रामपंचायत निवडणुका जाहीर होणार आहेत. आपल्या पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार कसे निवडून येतील…

आजच्या स्पर्धात्मक युगात मुलांना शिक्षणासमवेत फिटनेसची अत्यंत गरज..
भाजप युवा नेते संदीप गावडे यांच प्रतिपादन.. सावंतवाडी प्रतिनिधीआजच्या स्पर्धात्मक युगात मुलांना शिक्षणासमवेत फिटनेसचीअत्यंत गरज आहे. ‘तिरंगा दौड’ सारख्या मॅरेथॉन स्पर्धेच्या माध्यमातून ती पूर्ण होते, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. भविष्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चांगले अधिकारी घडावेत, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत, असे मत हर घर तिरंगा उपक्रमाचे जिल्हा संयोजक तथा भाजपा युवा नेते संदीप गावडे…

पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ..
सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधीराज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ पार पडणार आहे. हा समारंभ शुक्रवार दि. 15 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 9.05 वा. सिंधुदुर्ग जिल्हा मुख्यालय, पोलीस परेड ग्राऊंड सिंधुदुर्गनगरी येथे पार पडणार आहे. या ध्वजारोहणानंतर सकाळी 9.05 ते 9.15 वा. पोलीस दल, राज्य राखीव दल…

बांदीवडे येथे अनधिकृत वाळू वाहतूक करताना तीन डंपर जप्त..
मसुरे प्रतिनिधीबांदिवडे मळावाडी येथे शनिवार दिनांक नऊ ऑगस्ट रोजी संध्याकाळी उशिरा अनधिकृत वाळू वाहतूक करत असलेले तीन डंपर पोलीस प्रशासन व महसूल विभाग यांनी संयुक्तरित्या कार्यवाही करून जप्त केले असून सदरचे तिन्ही डंपर मसुरे पोलीस दुरक्षेत्र येथे आणण्यात आले होते. याबाबत आचरा पोलीस ठाणे येथे एफ आय आर दाखल करण्यात आला. दोन दिवसांपूर्वीच याच भागातील…

माध्यमिक शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार रखडले
माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी- भरत केसरकर,नंदन घोगळे,सलिम तकीलदार यांची मागणी सिंधुदुर्ग प्रतिनिधीऑगस्ट महिना अर्धा उलटून गेला असून नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन सारखा सण पण होवून गेला, तरी पण माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक आणी शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे पगार अद्यापही झालेले नाहीत. श्रावण महिन्यातील ऐन सणासुदीच्या काळात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार न झाल्यामुळे त्यांचे हे महत्त्वाचे…

सावंतवाडीजवळ एसटी बसखाली चिरडून दुचाकीस्वाराचा मृत्यू
कोलगाव येथील घटना,सावंतवाडी पोलीस तपास करत आहेत सावंतवाडी प्रतिनिधीसावंतवाडी- कुडाळ मार्गावरील कोलगावआयटीआयजवळ जुन्या मुंबई-गोवा महामार्गावर एका दुचाकीस्वाराचा एसटी बसच्या चाकाखाली चिरडून जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना आज दुपारी सव्वा चार वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात मृतदेहाची ओळख पटवणे कठीण झाले आहे, कारण एसटीचे चाक चेहऱ्यावरून गेल्यामुळे चेहरा पूर्णपणे छिन्नविछिन्न झाला आहे. अपघातानंतर घटनास्थळी…

जिल्हात फक्त काही दिवसापुरतात मटका जुगार बंद,खुद्द सत्ताधाऱ्यांच्याच आशीर्वादामुळे सर्व अवैध धंदे खुलेआम सुरू
गेली पंधरा वर्षे महामार्ग पूर्णत्वास जात नाही ही खरी शोकांतिका परशूराम उपरकर;खड्डे बुजविण्याच्या नावे केवळ सिंधुदुर्गवासीयांची दिशाभूल सुरू कणकवली प्रतिनिधीसिंधुदुर्ग जिल्ह्यात मटका, जुगार, ड्रग्ज, गांजा आणि अवैध दारू विक्री जोरात सुरू असून या सर्व अनैतिक धंद्यांना सत्ताधाऱ्यांचे अभय आहे,” असा गंभीर आरोप माजी आमदार आणि शिवसेना नेते परशूराम उपरकर यांनी आज केला. तसेच सर्व रस्त्यांची…

पोलिस ठाण्यातील दिरंगाई विरोधात ७ ऑगस्टला जयंत बरेगार यांचे उपोषण
कुडाळ प्रतिनिधीयेथील पोलिस ठाण्यातील दिरंगाई आणि तपासामध्येचालढकल होत असल्याच्या निषेध करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते जयंत बरेगार यांनी उद्या ७ ऑगस्ट पासून जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला आहे. बरेगार यांनी ७ एप्रिल २०२१ ला कुडाळ पोलिसांत तक्रार दाखल केली होती, परंतु तब्बल १३ महिन्यांनी, १३ मे २०२२ ला या प्रकरणात एफआयआर नोंदवण्यात आला. तत्कालीन…

शासकीय जागेवरील देशद्रोही आरोपींची दुकाने त्वरित हटवा
सकल हिंदू समाज जिल्हाध्यक्ष सीताराम गावडे यांची मागणी सिंधुदुर्ग,प्रतिनिधी१ ऑगस्ट २०२५साटेली-भेडशी गावातील बाजारपेठेत शासकीय जागेवर अतिक्रमण करून चालवण्यात येणाऱ्या दुकानदारांविरोधात सकल हिंदू समाजाने तीव्र आंदोलनाची भूमिका घेतली आहे. यासंदर्भात सकल हिंदू समाजाचे जिल्हाध्यक्ष सीताराम गावडे यांनी प्रशासनाला ठणकावून इशारा दिला असून, “देशद्रोही कृत्य करणाऱ्या संबंधितांची दुकाने आठ दिवसात जमीनदोस्त करा, अन्यथा आम्ही हिंदू समाज ते…

देवगड येथे दुर्ग मावळा प्रतिष्ठान व दुर्ग रक्षक प्रतिष्ठान रेडी यांच्यामार्फत इतिहासाची साधने व प्रदर्शन कार्यक्रमाचे आयोजन
देवगड प्रतिनिधीतालुक्यातील शेठ म.ग हायस्कूल देवगड आणि अ. कृ.केळकर हायस्कूल वाडा येथे दुर्ग मावळा प्रतिष्ठान व दुर्ग रक्षक प्रतिष्ठान रेडी यांच्या सहकार्याने इतिहासाची साधने व प्रदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.इतिहास अभ्यासक व दुर्ग मावळा सदस्य ज्ञानेश्वर राणे यांचे इतिहासाची साधने यावर व्याख्यान व प्रदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमांमध्ये राणे यांनी विद्यार्थ्यांना धोप, तलवार,वक्रधोप,…
s00guh