लोकप्रतिनिधी-प्रशासन एकत्र येऊन कुडाळ तालुक्याचा विकास करू….

प्रफुल्ल वालावलकर:कुडाळ तालुक्यातील नवनिर्वाचित जि प आणि पं स सदस्यांचा सत्कार,कुडाळ पं स, सरपंच व ग्रामसेवक संघटनेचा पुढाकार..

कुडाळ
तालुक्यातील नवनिर्वाचित जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सर्व सदस्यांचा सत्कार करायला मिळणे ही आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. जो पर्यंत लोकप्रतिनिधी सोबत नाहीत तो पर्यंत कामे होत नाहीत. कारण लोकप्रतिनिधी हे जनतेशी जोडले असतात, लोकप्रतिनिधी व अधिकारी ही विकासाच्या रथाची दोन चाके व्यवस्थित चालली तर विकास झपाट्याने होईल व पालकमंत्री, आमदार यांचे तसेच आपल्या सर्वांचे तालुक्याच्या विकासाचे स्वप्न साकार होईल असे प्रतिपादन कुडाळ गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top