जि.प. अध्यक्ष प्रमोद कामत यांनी घेतली रवींद्र चव्हाण यांची सदिच्छा भेट…

सावंतवाडी:
भाजपचे नवनिर्वाचित जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची केसरी येथे सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान दोघांमध्ये विकास कामा संदर्भात विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.प्रमोद कामत यांनी नुकतीच जिल्हा परिषद अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर ही भेट घेतली असून, त्यानंतर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण जिल्हा दौऱ्यावर आले असता ही सदिच्छा भेट पार पडली. या चर्चेमुळे विकासाच्या कामांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top