मालवण:
आरोग्य विभाग जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांचा आजचा हा सिंधू आरोग्य मेळावा अतिशय स्तुत्य असा उपक्रम असून अशा आरोग्य मेळाव्यातून खऱ्या अर्थाने रुग्णांची सेवा होते. असे आरोग्य मेळावे प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत झाल्यास शासनाचा आरोग्य विषयक प्रश्न सोडवण्याचा उद्देश खऱ्या अर्थाने सफल होईल.
