देव वेतोबा कोकण वासियांना सुख समृद्धी लाभू दे.!

भाजप युवा नेते विशालजी परब व सपत्नीक यांच्यासह घेतले श्री देव वेतोबाचे दर्शन; कोकणच्या समृद्धीसाठी साकडे!

आरवली:
कोकणचे श्रद्धास्थान असलेल्या आरवली येथील श्री देव वेतोबा चरणी युवा नेते विशालजी परब यांनी सपत्नीक सौ. वेदिका परब यांच्यासह नतमस्तक होऊन दर्शन घेतले. यात्रेच्या निमित्ताने आयोजित या भेटीत त्यांनी कोकणातील जनतेच्या सुख, शांती आणि समृद्धीसाठी साकडे घातले.

जनतेशी संवाद आणि शुभेच्छा वेतोबाच्या यात्रेनिमित्त मंदिर परिसरात भाविकांची मोठी मांदियाळी होती. दर्शनानंतर विशालजी परब यांनी उपस्थित भाविकांशी आणि स्थानिक नागरिकांशी संवाद साधला. कोकणातील प्रत्येक नागरिक सुखी, समाधानी आणि आनंदी राहावा, तसेच समाजात सदैव ऐक्य, शांतता आणि प्रगती नांदावी अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

विशालजी परब यांच्या या भेटीमुळे मंदिर परिसरात कार्यकर्त्यांमध्ये आणि स्थानिक ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. आरवली आणि परिसरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले.

यावेळी आरवलीचे सरपंच समीर कांबळी, सरपंच, सागर तीर्थ एकनाथ कुडव, माजी सरपंच, शिरोडा मनोज उगवेकर, माजी सरपंच, आरवली तातोबा कुडव, मंदिर कमिटी सदस्य प्रसाद साळगावकर, किरण पालयेकर, मिलिंद साळगावकर आणि मयूर आरोलकर यात्रेच्या निमित्ताने राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीने आरवली नगरी भक्तीमय वातावरणात न्हाऊन निघाली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top