सावंतवाडी:
नगरपरिषदेच्या माध्यमातून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि पावसाळापूर्व नियोजनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या विविध गटार कामांचा शुभारंभ आज करण्यात आला. नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले यांच्या हस्ते शहरातील विविध सात प्रमुख विकासकामांचे भूमिपूजन आज पार पडले.
