सावंतवाडी:
स्पर्धा परीक्षा क्षेत्रात अधिकारी घडवणाऱ्या महेंद्रा अकॅडमीच्या वतीने विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला व्यासपीठ देण्यासाठी ‘रील स्पर्धा २०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे. “अधिकारी बनण्याचं स्वप्न… आता रीलमधून जगासमोर!” या संकल्पनेवर आधारित या स्पर्धेत उत्कृष्ट रील बनवणाऱ्या प्रथम क्रमांकाला १० हजार रुपये, द्वितीय क्रमांकाला ५ हजार रुपये आणि तृतीय क्रमांकाला २ हजार रुपये रोख बक्षीस व सन्मानपत्र दिले जाणार आहे.
या स्पर्धेसाठी “महेंद्रा अकॅडमी-अधिकारी घडवणारी फॅक्टरी” ही मुख्य थीम असून, स्पर्धा परीक्षेची तयारी, संघर्ष ते यश आणि अकॅडमीमधील विद्यार्थ्यांचे अनुभव या विषयांवर ६० सेकंद ते १ मिनिट ५० सेकंदांपर्यंतची एचडी क्वालिटी रील तयार करायची आहे.
स्पर्धेत केवळ पहिल्या ५० स्पर्धकांनाच सहभाग दिला जाणार असून नाव नोंदणीची अंतिम तारीख २० मे २०२६ आहे. तर स्पर्धेचा कालावधी २१ मे ते ५ जून २०२६ असा राहील. इच्छुक विद्यार्थ्यांनी नाव नोंदणीसाठी महेंद्र पेडणेकर (9022686944) किंवा आदित्य राऊळ (7588147028) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
