सुशांत नाईक, संकेत नाईक यांना मिळालेले नगरसेवक पद राणेंच्याआशीर्वादामुळे…

नैतिकता असेल तर राजीनामा द्या:माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांचे नाईकांना आव्हानं..

कणकवली:
आमदार निलेश राणे यांच्या पत्रकार परिषदेतील वक्तव्यानंतर कणकवली नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष सुशांत नाईक आणि त्यांचे बंधू नगरसेवक संकेत नाईक यांना थोडी जरी लाज असेल तर त्यांनी नगरसेवक पदाचा राजीनामा द्यावा.नाहीतर यापुढे राणे कुटुंबियांवर टीका करण्याची हिम्मत करू नये. असा स्पष्टच इशारा माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिला आहे. ते माध्यमांसोबत बोलतं होते.
कणकवली नगरपंचायतीमध्ये सुशांत नाईक आणि संकेत नाईक यांना मिळालेले नगरसेवक पद हे राणे कुटुंबीयांच्या आशीर्वादामुळे मिळालेले आहे. हे आता तर ते सिद्ध झालेले आहे. असे असताना ज्यांच्या कृपाशीर्वादाने निवडून आले त्याच राणे कुटुंबियांवर टीका करणे नैतिकतेला धरून नाही. नाईक कुटुंबियांमध्ये थोडी तरी नैतिकता असेल तर ते स्वतःच्या नगरसेवक पदाचा राजीनामा देतील. असा टोला समीर नलावडे यांनी लगावला आहे.
राणेंच नेतृत्व मान्य केलात म्हणून तुम्ही खुर्चीत बसलात.नाहीतर नाईकांच्या घरातील उपनगराध्यक्ष 2008 पूर्वी होते. आता झालाच नसता.हिम्मत असेल तर राजीनामा देऊन पुन्हा निवडून येऊन दाखवा असे आव्हान त्यांनी दिले.निवडणुकीला तुम्हाला राणेंचे पैसे लागतात.त्यांच्या जीवावर निवडून येता मग द्या राजीनामे. बघूया परत कोण निवडून येत. असे आव्हान समीर नलावडे यांनी वैभव नाईक यांना दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top