झाराप:
येथील आराध्य हॉटेल येथे कुडाळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांची जयंती मोठ्या आदराने साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमादरम्यान उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी
अजितदादांच्या आठवणींना उजाळा दिला.चांगल्या कामाला प्रोत्साहन देणे आणि गुणवत्तेची दखल घेणे, हा त्यांच्या नेतृत्वाचा महत्त्वाचा गुण होता. प्रशासनावर असलेली त्यांची भक्कम पकड, निर्णयक्षमता आणि कामातील स्पष्टता यामुळे विकासकामांना नेहमीच गती मिळाली. दादांसारखा असा नेता आजपर्यंत आम्ही पाहिला नव्हता. त्यांची काम करण्याच्या पद्धतीवर आम्ही चालत आहोत.असा नेता पुन्हा होणे नाही.दादांची प्रेरणा घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत.त्यांच्याअशा अकाली निधनामुळे महाराष्ट्राने एक तडफदार आणि कर्तबगार नेतृत्व गमावले असून, संपूर्ण राज्यातील सामान्य कार्यकर्त्यांना त्यांची उणीव सतत भासत राहील,अशी भावना या वेळी व्यक्त करण्यात आली.
…यावेळी एमके गावडे
जिल्हाध्यक्ष संदीप राणे, महिला जिल्हाध्यक्ष प्रज्ञा परब, तालुकाध्यक्ष कुडाळ आर के सावंत,संदीप पेडणेकर तालुकाध्यक्ष वेंगुर्ला, मनोहर साटम जिल्हा कार्यकारणी सदस्य, अशोक सावंत, रवी म्हाडगूत, भीतीये, संतोष सावंत, किरण सावंत, उमेश पेंडूरकर, एकनाथ केसरकर,यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
