कोकणच्या रानभाज्या आता जगाच्या ताटात! इन्सुली महोत्सवाने दाखवली महिला उद्योजकतेची नवी वाट!”

सौ. वेदिकाताई परब यांचा महाराष्ट्रासह देशभर उपक्रम नेण्याचा संकल्प

सावंतवाडी प्रतिनिधी :
रानभाजी महोत्सव व पाककला स्पर्धा या कार्यक्रमास महाराष्ट्र भाजपा चे युवा नेते विशालजी परब आणि सौ. वेदिकाताई परब यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरुवात झाली. त्यावेळी विशालजी आणि वेदिकाताई यांनी उपस्थित सर्व स्पर्धकांशी संवाद साधला आणि त्यांना शुभेच्छा दिल्या.!

सावंतवाडी पंचायत समितीचे उपसभापती गौरव मुळीक यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी डॉ. विजय दळवी – सहयोगी अधिष्ठाता, श्री. नितीन एकनाथ राऊळ – जिल्हा परिषद सदस्य, इन्सुली, श्री. सदाशिव विठ्ठल राणे – पंचायत समिती सदस्य, श्री. महेश शिवाजी सावंत – अध्यक्ष, विद्या विकास मंडळ, इन्सुली तसेच श्री. सचिन दळवी – उपाध्यक्ष, विद्या विकास मंडळ, इन्सुली, माजी शिक्षण सभापती गुरुनाथ पेडणेकर, खजिनदार सदानंद कोरगावकर, महेंद्र पालव, साईनाथ राणे, मुख्याध्यापक शेवाळे सर, अजय कोठावळे यांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top