गणेशोत्सवात सामाजिक बांधिलकी जपणारा नेता विशाल परब

दिव्यांग बांधवांना मदतीचा हात

सावंतवाडी प्रतिनिधी
गणेशोत्सव म्हणजे केवळ उत्सव नाही… तर आनंद वाटण्याचा, माणुसकी जपण्याचा आणि गरजवंतांच्या चेहऱ्यावर समाधानाचं हास्य फुलवण्याचा सण…याच भावनेतून भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी वेंगुर्ला तालुक्यातील दिव्यांग बांधवांसाठी गणेश चतुर्थीनिमित्त मदतीचा हात पुढे केला आहे.
गणरायाच्या आगमनाची तयारी सुरू असतानाच, दिव्यांग बांधवांना गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंच्या शिध्याचे वाटप करण्यात आले. विशाल परब यांच्या हस्ते हा शिधा वितरित करण्यात आला.
गणेश चतुर्थीचा उत्साह… त्यात वाढती महागाई… आणि दुसरीकडे रोजच्या गरजांसाठी संघर्ष करणारे दिव्यांग बांधव… अशा परिस्थितीत त्यांच्या गरजा ओळखून मदतीचा हात देणं, हीच या उपक्रमाची खरी संवेदनशीलता आहे.
‘गरज आहे ती केवळ मदतीची नाही… तर आपुलकीच्या हाताची!’
आणि हाच आपुलकीचा हात भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी पुढे केला आहे.या उपक्रमावेळी भाजपचे नगराध्यक्ष राजन गिरप, उपनगराध्यक्ष सुहास गावंढळकर,बाळू देसाई यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
गणरायाच्या आगमनाच्या आनंदात समाजातील प्रत्येक घटक सहभागी व्हावा, कुणाच्याही घरात सणाचा आनंद कमी पडू नये, या भावनेतून करण्यात आलेल्या या उपक्रमाचे दिव्यांग बांधवांकडून स्वागत होत आहे.मदतीचा हात जेव्हा गरजूंपर्यंत पोहोचतो… तेव्हा त्या मदतीचं मोल पैशांत नाही, तर मिळणाऱ्या समाधानाच्या हास्यात दिसतं…आणि म्हणूनच गणेशोत्सवाच्या या मंगलमय पर्वात विशाल परब यांच्या या संवेदनशील उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top