वनराई बंधारा बांधत पत्रकारांनी समाजासमोर निर्माण केला आदर्श…

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्यासह पत्रकार , आशिये ग्रामपंचायत, ग्रामस्थांचा बंधारा निर्मितीत सहभाग…

बंधारा उभारणीत सहभाग घेऊन पाणी अडविण्याचे विद्यार्थ्यांनी घेतले धडे..

सिंधुदुर्ग:
पाणी हेच जीवन असून, त्याचे संवर्धन ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, हा संदेश विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष श्रमदानातून देत आशिये ग्रामपंचायत हद्दीत टेंब़वाडी येथे भविष्यातील पिढीने जलसाक्षरतेचे धडे घेतले. कणकवली तालुका पत्रकार संघ आणि आशिये ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषदेच्या शाळेनजीक ओहळीवर वनराई बंधारा उभारण्यात आला. या उपक्रमात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी पत्रकार, विद्यार्थी, ग्रामस्थ आणि महिला शेतकरी गटांच्या सदस्यांसमवेत श्रमदान केले.

जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जलसंधारणाच्या कामांना लोकसहभागाची जोड मिळत आहे. पावसाचे पाणी वाहून न जाता ते स्थानिक पातळीवर अडवून जिरविणे, भूजल पातळी वाढविणे आणि उपलब्ध पाणीसाठा अधिक काळ टिकविणे या उद्देशाने वनराई बंधारे उभारले जात आहेत. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतल्याने जलसंधारणाचे महत्त्व त्यांच्या कृतीतूनच त्यांच्या मनावर बिंबविले गेले.

वनराई बंधारा उभारणीच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना श्रमाची प्रतिष्ठा, पाणी बचत, जलस्रोतांचे संवर्धन आणि पर्यावरण संरक्षण यांचे महत्त्व अनुभवातून समजले. केवळ जलसंधारणाबाबत माहिती देण्यापेक्षा प्रत्यक्ष श्रमदानात सहभागी करून घेणे हा विद्यार्थ्यांमध्ये जलसाक्षरता निर्माण करण्याचा प्रभावी मार्ग ठरला.

कणकवली तालुका पत्रकार संघाने जलसंधारणाच्या प्रत्यक्ष श्रमदानात सहभागी होत सामाजिक बांधिलकी जपली आहे. पत्रकारांनी ग्रामपंचायत, प्रशासन, विद्यार्थी आणि ग्रामस्थांना सोबत घेऊन उभारलेला हा वनराई बंधारा दुष्काळसदृश्य परिस्थितीत समाजभानातून उचललेल्या पुढाकाराचे उदाहरण ठरेल.

यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी ग्रामपंचायत अंतर्गत सुरू असलेल्या ‘जलतारा’ कामाचीही पाहणी केली. वनराई बंधारा उभारणीच्या या उपक्रमात यावेळी उपविभागीय अधिकारी जगदीश कातकर, तहसीलदार दीक्षांत देशपांडे, गट विकास अधिकारी अरुण चव्हाण, सरपंच महेश गुरव, उपसरपंच संदीप जाधव, जिल्हा पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष उमेश तोरसकर, सचिव बाळ खडपकर, उपाध्यक्ष संतोष राऊळ, कार्यकारिणी सदस्य लक्ष्मीकांत भावे, कणकवली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष भगवान लोके, सचिव संजय सावंत, खजिनदार रोशन तांबे, उपाध्यक्ष नितीन कदम, उमेश बुचडे, ज्येष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर, रमेश जोगळे, माजी तालुकाध्यक्ष चंद्रशेखर देसाई, वीरेंद्र चिंदरकर, महेश सरनाईक, आनंद तांबे, राजन चव्हाण, सुधीर राणे, संजय बाणे, रमाकांत बाणे, तुषार हजारे, विराज गोसावी, दर्शन सावंत, विनोद जाधव, प्रथमेश जाधव,ग्रा. पं. सदस्य सुहास गुरव, माजी सरपंच शंकर गुरव, सदानंद बाणे, पाडुरंग बाणे, सत्यवान धुरी, प्रवीण ठाकूर, निलेश ठाकूर, मिलिंद करंबेळकर, सुहास खानोलकर, ग्रामसेवक राकेश गोवळकर, मुख्याध्यापिका वृषाली मसुरकर, श्री. कदम, विजय मसुरकर, श्रीमती पांचाळ, निधी पुजारे, प्रकाश गुरव, तालुका कृषी अधिकारी प्रवीण ओहोळ यांच्यासह तालुक्यातील पत्रकार, प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी, आशिये ग्रामपंचायतीचे ग्रामस्थ, शालेय विद्यार्थी आणि महिला शेतकरी गटांचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top